विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळ ,जाफराबाद संचलित ज्ञानसागर माध्यमिक विद्यालय सिपोरा अंभोरा ता जाफराबाद जि.जालना या विद्यालयाची सुरुवात दिनांक 12/6/1995 ला वर्ग आठवी ने झाली. पहिल्या वर्षी केवळ 30 विद्यार्थी होते. सन 1997- 98 ला वर्ग पाचवी ते दहावीची सुरुवात होऊन पहिल्याच वर्षी एसएससी चा निकाल 100% लागून शाळा तालुक्यात सर्वप्रथम आली.आणी त्यानंतर शाळेची गुणवत्ता पाहून विद्यार्थ्यांचे अक्षरशः रांग लागली थोड्याच कालावधीत शाळेने जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आज रोजी विद्यालयात वर्ग पाचवी ते बारावी चे वर्ग असून आतापर्यंत एकूण 6500 विद्यार्थी नोंद रजिस्टर ला नोंदवले गेले आहेत.
त्याचप्रमाणे कला, क्रीडा, विज्ञान ,भाषा ,शास्त्र ,सांस्कृतिक ,सामाजिक, स्काऊट गाईड व राष्ट्रीय कार्यक्रमात शाळेचे भरीव योगदान असून सन 2023-24 ला ''मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा" या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून तीन लक्ष रुपयाचे बक्षीस मिळवीले आहे.
क्रीडा क्षेत्रात आतापर्यंत वेगवेगळ्या खेळ प्रकारात 206 विद्यार्थी राज्य स्तरापर्यंत तसेच अनेक विद्यार्थी देश पातळीवर पोहोचलेले आहे .शाळेत खेळाचे भव्य प्रांगण असून परसबाग, कलादालन, संगणक कक्ष, भव्य असे ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा ,गणित पेटी ,अनुभवी उच्च शिक्षित शिक्षकवृंद ,सुमारे दोन एकर जागेत 650 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्ष, मुला-मुलींसाठी स्वतंत्र सुलभ शौचालये , सर्व मुलांना वॉटर फिल्टर द्वारे पिण्याचे पाणी ,बैठकीसाठी प्रत्येक वर्गात ड्यूल डेक्स,सर्व वर्ग खोल्यामध्ये लाईट आणी फॅन ची व्यवस्था, वर्ग सजावट, रंगरंगोटी केलेली आहे.
अशा सर्व भोतिक सुविधा शाळेत उपलब्ध आहेत.